मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रासह देशातले लोकसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रात महायुतीच्या अवघ्या १७ जागा आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या ४५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा दावा सुरुवातीला केला गेला. मात्र निवडणुकीच्या फेऱ्या आणि विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांनी ४५ प्लसच्या दाव्यातली हवा काढली. अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केलेली बारामतीची निवडणूकही ते जिंकू शकले नाहीत. अजित पवार गटला लोकसभा निवडणुकीत रायगडचीच जागा जिंकता आली आहे. यानंतर अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही. मात्र निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. यानंतर अजित पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे.
अजित पवारांनी बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलवली. त्यानंतर त्यांनी बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन युगेंद्र पवारांना दूर करण्याचा निर्णय घेतला. बैठकीला उपस्थित न राहिल्याचं कारण कुस्तीगीर परिषदेने दिलं. त्यानंतर अजित पवारांनी हा निर्णय घेतला. अशी माहिती समोर येते आहे. या निर्णयाबाबत युगेंद्र पवार आणि शरद पवार गट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.
याप्रकरणात युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला काही सांगता येणार नाही. काही लोकांनी मला पण सांगितलं की परवा कुठेतरी एक मीटिंग झाली. पण माझ्या कानावर आले पण माझ्यापर्यंत कुठल्याही ऑफिशियल चैनल कडून काय अजून माझ्याकडून काय पत्र किंवा असं काय आलेलं नाही. तीन-चार वर्षांपासून कुस्ती संघाची जबाबदारी माझ्याकडे घेतली. त्याच्या आधी श्रीनिवास बापू ते बघत होते. चांगलं काम केलंय. तिथले पैलवान चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना सोयी सगळे सुविधा देऊ शकलो. दादांनी पण तिथे खूप मदत केली आहे. दादांनी पण तिथं आम्हाला इमारतीला मदत केली. त्यामुळे पैलवानांना प्रोत्साहन मिळाले.