मुंबई (वृत्तसंस्था) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या निवास स्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर नुकतेच पोहोचले आहेत.
अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर ते नेमके कुठे गेले होते. याची कुणालाही माहिती नव्हती. अजित पवार यांचा मोबाईलही बंद होता. अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान अजित पवार थोड्याच वेळापूर्वी शरद पवार यांच्या निवास स्थानी दाखल झाले आहेत.