यावल येथे रा.काँ.अजीत पवार पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजीत पवार) गट यांच्या वतीने १०नजून २o२४ रोजी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यावल तालुका च्या कार्यालयात राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रितेश पाटील, राष्ट्रवादीचे ॲड.देवकांत पाटील, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष तथा कोरपावली ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच विलास अडकमोल, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष जितेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यउपाध्यक्ष तथा विरावली विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, राष्ट्रवादीचे गणेश तायडे,योगेश पाटील, सामाजिक न्यायाचे राजू बोदळे, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्ह्या अध्यक्ष राकेश सोनार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विनोद पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजेश करांडे, इस्माईल तडवी,विजय पाटील,संजय पाटील,सलीम तडवी .गजानन अल्करी,मोहन सोनवणे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी पक्षध्वजाचे पूजन करून राष्ट्रगीतासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Protected Content