बारामतीतून अजित पवारच राष्ट्रवादीचे उमेदवार : प्रफुल्ल पटेल

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जुलै २०२३ मध्ये अजित पवार हे महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे ४१ आमदारही आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर २०२४ च्या मे महिन्यात महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) विरुद्ध सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष असा सामना पार पडला.

यात सुप्रिया सुळे विजयी झाल्या. त्यानंतर काही दिवसांनी अजित पवारांनी त्यांची चूक मान्य केली. तसंच बारामतीतून निवडूक लढवणार नसल्याचंही जाहीर केलं. आता मात्र अजित पवारच बारामतीतून लढतील हे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे. बारामतीतून अजित पवार हेच उमेदवार असतील असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.

सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या आहेत. तसेच अजित पवारांच्या त्या बहीण आहेत. सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभे करुन आपण चूक केली. हे व्हायला नको होते असे अजित पवारांनी एका मुलाखतीत मान्य केले होते. त्यानंतर अजित पवार हे आता बारामती लढणार नाहीत अशा चर्चाही रंगल्या, तसंच त्यांच्याकडूनही हे सांगण्यात आलं. मात्र आज प्रफुल्ल पटेल यांनी हे जाहीर केले की बारामतीतून अजित पवारच उमेदवार असतील.

Protected Content