Home Cities यावल अजित पवार गटाच्या ‘युवा संवाद’ अभियानाला यावलमधून सुरूवात !

अजित पवार गटाच्या ‘युवा संवाद’ अभियानाला यावलमधून सुरूवात !


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘अजित पर्व युवा संवाद ग्राम संपर्क अभियान’ ला आज यावल तालुक्यातून मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या अभियानाचा आणि एलईडी व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाद्वारे सर्वसामान्य लोकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्याचा मुख्य उद्देश आहे.

या शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर रथाचे (एलईडी व्हॅन) प्रक्षेपण करण्यात आले. या अभियानांतर्गत शासकीय योजनांचे हँडबिल (माहितीपत्रके) वाटप करून गावपातळीवर थेट संपर्क साधण्यात येणार आहे.

या अभियानाची संकल्पना असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद बंगालसिंह चितोडीया (चव्हाण) यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “या ‘अजित पर्व युवा संवाद ग्राम संपर्क अभियानाचा’ लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्यासाठी आपण गाव पातळीवर जाऊन हँडबिलचे वाटप करावे आणि अधिकाधिक लोकांना या अजित पर्वामध्ये सामील करून घ्यावे.”

यावेळी यावल तालुक्याचे तालुकाध्यक्ष रितेश उर्फ रॉकी पाटील, युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, राजू करंडे, कदीर खान, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, अलीम भाई, जुगल पाटील, योगेश पाटील, कृष्णा चौधरी, विलास भास्कर आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील काळात ‘अजित पर्व युवा संवाद ग्राम संपर्क अभियानाची’ एलईडी व्हॅन यावल तालुक्यामध्ये युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, तालुकाध्यक्ष रितेश पाटील आणि संपूर्ण तालुका युवक राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली गावपातळीवर योजना राबवणार आहे. या अभियानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound