जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूकीसाठी अजित पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज २ सप्टेंबर रोजी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुक लढवण्याची तयारी दर्शवली असता त्यांनी दुसऱ्या टप्प्यासाठी १६ उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू आणि काश्मीरचे प्रभारी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी ही यादी जाहीर केली.

 

पक्षाच्या संसदीय मंडळाने काश्मीर खोऱ्यातील 3 प्रमुख जिल्ह्यांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी 16 उमेदवारांच्या नावांना मान्यता दिली आहे. हे सर्व उमेदवार घड्याळ या निवडणूक चिन्हावर पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये कोणतीही आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवत आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ९० जागांवर तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबरला एकूण 26 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

Protected Content