
मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीशी बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट देण्यात आल्याचे वृत्त समोर आल्याने राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चीट दिल्याचे वृत्त सीएनएन न्यूज १८ ने दिले आहे. अजित पवार आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असताना झालेल्या सिंचन घोटाळ्यावरून ते तपास यंत्रणांच्या रडारवर होते. लाचलुचपत विभाग, सक्तवसुली संचालनालय यांच्याकडून सिंचन घोटाळ्याचा तपास सुरु होता. देवेंद्र फडणवीस हे २०१२ मध्ये विधानसभेत विरोधी बाकावर असताना कायम अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप करीत होते. मात्र आता अजित पवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.
