यावल प्रतिनिधी । भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीच्या उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी अजय बढे तर समन्वयकपदी प्रसन्न देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
प्रसन्न पाटील हे स्व गुणवंत राव भास्करराव पाटील नायगाव तालुका यावल चे रहीवासी होते ते माजी निवड मण्डल सदस्य महाराष्ट्र राज्य यांचे सुपुत्र असून व उत्तर महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष जळगाव विभागपदी अजय रामकृष्ण बढे कोरपावली तालुका यावल यांची नियुक्ती ही काल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी दिल्ली यांचे कडून नाशिक विभागासाठी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेस यांचे साठीह्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्यांना या बद्दल यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष संदीप भैय्या पाटील, महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस विनायकराव जी देशमुख , खान्देश काँग्रेस समन्वयक योगेंद्र सिंह पाटील( बंटी भैय्या), जिल्हा अध्यक्ष गणेश भैय्या बारसे , कार्याध्यक्ष फय्याज हुसैन,यावल तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, काँग्रेस कमेटीचे यावल शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, यावल पंचायत समिती गट नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील, जुगल घारू, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिर खान , ॲड नितीन चौधरी, ॲड देवेंद्र बाविस्कर , ॲड लोंढे, काँग्रेस अनुसुचित जाती जमातीच्या उपाध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे, सौ मनीषा ताई पाचपांडे, सौ पवार ताई,सौ प्रेरणा भंगाळे ,योगिताताई शुक्ला, मीनाताई तडवी ,मदिना तडवी,
समाधान पाटील यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले असुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.