यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथील अजय बढे यांची महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कोरपावली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गावाचे युवा सरपंच विलास नारायण अडकमोल यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता . महाराष्ट्र प्रदेश असंघटीत काँग्रेसच्या विभागीय उपाध्यक्षपदी निवड झालेले अजय बढे हे कोरपावली येथील कै .डॉ . रामकृष्ण के बढे यांच्या पुत्र आहेत . ग्रामपंचायतमध्ये संपन्न या सत्कार सोहळ्यास कोरपावली गावाचे युवा समाजसेवक मुक्तार पिरण पटेल, ग्रामसेवक प्रविण सपकाळे, शिपाई किसन तायडे, प्रवीण अडकमोल, सलीम तडवी , जुम्मा तडवी, वसीम तडवी यांच्यासह गावातील विविध क्षेत्रातील पदधिकारी तथा काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. या निवडीबद्दल अजय बढे यांचे विविध संघटना व सामाजीक क्षेत्रातील पदाधिकारी यांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे .