खळबळजनक : आसामधून हवाई दलाचे लढाऊ विमान बेपत्ता

images 2019 02 27T130216.444

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय हवाई दलाचे एएन-३२ हे लढाऊ विमान आसाममधून बेपत्ता झाले आहे. या विमानात ५ प्रवाशांसह एकूण ८ जण होते. दुपारपासून बेपत्ता झालेल्या या लढाऊ विमानाचा कोणताही संपर्क होत नसल्याने खळबळ उडाली असून हवाई दलाने बेपत्ता विमानाचा शोध सुरूर केला आहे.

 

गेल्या तीन तासांपासून एएन -32 हे विमान बेपत्ता असून याचा शोधकार्य सुरू आहे. या विमानात आठ कर्मचारी आणि 5 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हवाई दलाने सुखोई-30 आणि सी-130 स्पेशल ऑप्स विमाने शोधमोहिमेसाठी रवाना केली आहेत. प्रदेशसाठी हे विमान निघाले होते. दुपारी १२.२५ वाजता या विमानाने उड्डाण घेतले होते. या विमानाशी हवाई दल प्रशासनाचा दुपारी १ वाजता शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर या विमानाचा संपर्क झाला नसल्याचे हवाई दलाकडून सांगण्यात आले.

Add Comment

Protected Content