मुळजी जेठा महाविद्यालय येथे एड्स सप्ताह साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतिक एड्स दिनानिमित्त मुळजी जेठा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक शासकीय रुग्णालय जळगाव येथे गेले त्या ठिकाणी त्यांना रुग्णालयाचे अधिष्ठता यांनी एड्स जनजागृती बद्दल विद्यार्थ्यांनी शपथ दिली. त्यानंतर स्वयंसेवकांनी गावामध्ये रॅली काढून एड्स बद्दल समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी संदेश दिला तसेच या सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांनी गावामध्ये पथनाट्य साजरे करून समाजात एड्स जनजागृती केली. या सप्ताहमध्ये पोस्टर स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांकडून पोस्टर घेऊन पोस्टरद्वारे समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.

एड्स सप्ताहाच्या सांगता वेळी 08 डिसेंबर रोजी प्रा. डॉ. भूषण कवीमंडन यांनी विद्यार्थ्यांना एड्स बद्दल विशेष असे मार्गदर्शन केले.मार्गदर्शनात त्यांनी एड्सचा प्रसार कसा होतो त्याचा उगम कुठून झाला व समाजातील घटकांनी त्याबद्दल कशी जागरूकता ठेवली पाहिजे याचे सखोल मार्गदर्शन स्वयंसेवकांना केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विशाल देशमुख सहाय्य कार्यक्रमाधिकारी डॉ. अखिलेश शर्मा , महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.जयश्री भिरूड उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.भिरुड यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ.विशाल देशमुख यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भावेश इंगळे, योगेश भोई, मयुरी पाटील, जीवन शेळके, गोपाल पाटील व बहुसंख्य स्वयंसेवक उपस्थित होते.

Protected Content