फैजपूर प्रतिनिधी । एड्स सारख्या रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो. त्याचप्रमाणे, जागतिक एड्स निर्मुलन दिनाचे अैचित्य साधत आयसीटीसी विभाग, ग्रामीण रुग्णालय न्हावीच्या वतीने दि.1 ते 15 डिसेंबर दरम्यान एड्स निर्मूलन पंधरवाडा शहरात साजरा करण्यात येत असून शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली.
या रॅलीच्या शुभारंभ डॉ.अजित थोरबोले व नगराध्यक्षा महानंदा होले, रवींद्र होले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला. जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्ताने युवावर्गाने उस्फूर्तपणे सहभाग घेऊन सर्वसामान्यांपर्यंत एड्ससंबंधी असलेले गैरसमज आणि त्यासोबत एड्स पासून स्वतःचे आणि समाजाची सुरक्षा करण्यासंबंधी उपायोजना पोहोचवणे तरुण पिढीचे कर्तव्य आहे. यासोबत प्रत्येकाने सद्सदविवेक बुद्धीने वागावे, स्वतःचे विचार व्यावहारिक असावेत, आणि एड्स निर्मूलनासाठी सर्वजणांनी कटिबद्ध राहू घेतलेली शपथ प्रत्येकाने जपावी, असे आवाहन येथील प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे.
या महाविद्यालयांनी घेतला सहभाग
यानिमित्त फैजपूर येथे म्युनिसिपल हायस्कुल, कै. कुसुमताई मधुकरराव चौधरी माध्यमिक शाळा, जे.टी.महाजन आय.टी.आय, धनाजी नाना महाविद्यालय कनिष्ठ विभाग, धनाजी नाना महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेनेचे कडेट्स, कै. लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यासोबत इतर विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
९०० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
यावेळी शहरातून भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. त्यात सुमारे ९०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
एचआयव्हीची कीड, निष्क्रिय करी शरीर, घरी असताना लक्ष्मी का जाताय नरकाच्या दारी, वचन पाळा एड्स टाळा, सुरक्षित रहा सतर्क रहा. अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमले. त्याचप्रमाणे, यावर्षी ‘समाज बदल घडवू शकतो’ हे या वर्षाचे ब्रीद म्हणून प्रसार व प्रचार करण्यात येत आहे.
एड्स निर्मुलनाची शपथा
यासोबत एड्सच्या प्रतीकाची मानव साखळी तयार करण्यात आली. यासोबत एड्स निर्मूलनाची सामूहिक शपथ घेण्यात आली. यानंतर या पंधरवड्या दरम्यान विविध स्पर्धा आणि खेळांच्या माध्यमातून तरुणांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत एड्स जनजागृती करण्याचा मानस आहे, असे मत श्री मनोज चव्हाण समुपदेशक, आय सी टी सी, ग्रामीण रुग्णालय न्हावी यांनी व्यक्त केले.
उपस्थिती व परिश्रम
यावेळी म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.एल.आगळे, वाय.एस.महाजन, बी.डी.महाले, एस.एम.राजपूत, एस.ओ.सराफ, प्रा.डॉ.शरद बिऱ्हाडे, प्रा.डॉ.रवी केसुर, प्रा. वंदना बोरोले, एस.जे.तळेले, मुख्याध्यापक डॉ.सचिन राणे, सपना लासुरे, प्रवीण फालक, यासोबत प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांनी तर आभार मनोज चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज चव्हाण, पौर्णिमा चौधरी, रिता धांडे, निलिमा धांडे, प्रा. लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांनी परिश्रम घेतले.