अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अहमदनगर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके आमने-सामने होते. या निवडणुकीत विद्यमान खासदार असलेल्या सुजय विखे यांना पराभवाला सामोरे जावे लागले, तर निलेश लंके यांचा मोठ्या मताधिक्यानी विजय झाला.
सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये प्रचारादरम्यानच अनेक आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले होते. निवडणुकीच्या निकालानंतर आता निलेश लंके यांच्या स्वीय सहाय्यकावर पारनेरमध्ये जीवघेणा हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे. नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे स्वीय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर पारनेरमध्ये हा हल्ला झाला. ८ ते ९ जणांनी झावरे यांच्यावर हल्ला असून केल्याची माहिती सांगितली जात आहे. यासंदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे.
नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे स्वीय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये त्यांच्या गाडीची तोफफोड करण्यात आली आहे. तसेच या हल्ल्यात राहुल झावरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तसेच हा हल्ला कोणी आणि का केला? याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला की नाही, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभू नये, यासाठी पारनेरमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.