पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेला कृषी विभाग कालच पारोळा येथे कृषी अधिकारी शरद बोरसे यांची कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटना पारोळाकडून शरद बोरसे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
शेतकरी संघटनेकडून खरीप २०१९ चा विमा तालुक्यातून खूप शेतकऱ्यांनी घेतलेला असून पीक पंचनामे होऊन बराच कालावधी लोटला असून आजतागायत शेतकऱ्यांना पीक विमा पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. महाराष्ट्र सरकारने ओला दुष्काळ म्हणून शेतकऱ्यांचे पीक पंचनामे करून काही स्वरूपात अनुदान दिले. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीने वेठीस धरू नये. पिक विमा देण्यास उशीर होत असल्यास शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करीन असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष दत्तू पाटील शिरीष पाटील, नरेश चौधरी, शांताराम पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.