जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रोडवरील रस्त्यात खड्डा पडला आहे. जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते भरत कर्डीले यांच्या नेतृत्वात सहकाऱ्यांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांना रांगोळी, हळद कुंकू आणि पुष्पहार वाहून अनोखे आंदोलन केले. रस्ता तातडीने दुरूस्ती करावा अन्यथा नागरीकांना सोबत घेवून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सामाजिक कार्यकर्ते भरत कर्डीले यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करण्यात आले. जळगाव महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारा सुरू आहे. या रस्त्यावरून जळगावचे आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते आणि प्रत्येक नगरसेवक या रस्त्यावरून जातात परंतू या रस्त्यावरील खड्डा कुणालाच दिसत नाही. मुख्य रस्त्यावरील खड्डा बुजला जात नाही तर इशरातील इतर ठिकाणातील परिस्थीत काय ? असे असा सवाल भरत कर्डीले यांनी केला आहे.