मतदान केल्यानंतर मिळणार पेट्रोल, डिझेल खरेदीवर सूट

petrol and voting

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मतदान केल्यानंतर इंधन भरण्यासाठी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल, डिझेलवर प्रतिलीटर 50 पैसे सूट मिळणार आहे, अशी घोषणा ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने केली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याची माहिती ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी दिली आहे.

 

मतदान करुन आलेल्या मतदाराला पेट्रोल, डिझेल खरेदीवर प्रतिलीटर 50 पैशांची सूट मिळणार आहे. त्यासाठी मतदान केल्यानंतर बोटावरील शाई ग्राहकाला पेट्रोल पंपावर दाखवावी लागणार आहे. मतदारांसाठी ही ऑफर मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे, अशी माहिती देखील अजय बंसल यांनी दिली आहे. देशभरात सात टप्प्यात मतदान होणार असून 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यात तर 19 मे रोजी अंतिम टप्प्यात मतदान होणार आहे.

Add Comment

Protected Content