वॉशिंग्टन-वृत्तसेवा । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, अमेरिका इच्छित असल्यास क्युबासोबत “जे हवे ते करू शकते” आणि लवकरच कोणत्याही मार्गाने क्युबावर कब्जा करण्याचे ‘सन्मान’ मिळू शकते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका–क्युबा संबंधांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
हे विधान अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा अमेरिका आणि क्युबा यांच्यातील संबंध सुधारण्याच्या शक्यतांवर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. काही अहवालांनुसार, अमेरिकेला क्युबामध्ये राजकीय बदल हवा असून विद्यमान राष्ट्राध्यक्ष मिगेल डियाझ-कॅनेल यांनी सत्ता सोडावी, अशी अपेक्षा अमेरिकेकडून व्यक्त होत असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र क्युबाने या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आहे. क्युबा सरकारने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, देशाच्या अंतर्गत कारभारात कोणत्याही परकीय शक्तीचा हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही. क्युबाची सार्वभौमता आणि राजकीय व्यवस्था याबाबत कोणताही तडजोडीचा प्रश्नच येत नाही, असेही क्युबाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, क्युबा सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. देशात इंधन आणि विशेषतः तेलाची कमतरता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम वीजपुरवठ्यावर झाला आहे. अनेक भागांत दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होत असून काही दिवसांपूर्वी तर संपूर्ण वीज व्यवस्था ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी यापूर्वी केलेले आणखी एक विधानही चर्चेत आले आहे. त्यांनी सांगितले होते की, अमेरिका क्युबाशी चर्चेच्या प्रक्रियेत आहे; मात्र त्याआधी इराण संदर्भातील प्रश्न सोडवणे प्राधान्य असेल. त्यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात क्युबाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
व्हेनेझुएला व इराणनंतर ट्रम्पची ‘या’ देशावरही नजर