फैजपूर (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील चिखली बु येथील जिल्हा परिषद शाळे समोर लावलेली मोटार सायकल लांबविणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. शंकर नथ्थु सपकाळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तब्बल दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता.
या संदर्भात अधिक असे की, यावल तालुक्यातील चिखली बु येथील जिल्हा परिषद शाळे समोरून मोटार सायकल क्र.(एमएच 19 बीए 3352) ही दि 23 मे 2017 रोजी चोरी झाली होती. तब्बल दोन वर्षानंतर या मोटार सायकल चोरट्याचा तपास लागला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटार सायकल चोर शंकर नथ्थु सपकाळे (वय 24 रा शिरसाड ता यावल) याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्या कडून चोरीची मोटार सायकलही ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी सपोनि प्रकाश वानखडे हे कॉ गोकुळ तायडे तपास करीत आहे. दरम्यान या चोरट्याकडून मोटार सायकल चोरीचे आणखी काही गुन्हे उघड येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.