पहूर , ता . जामनेर ( रविंद्र लाठे )
“ये दोस्ती हम नहीं तोडेंगे
तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे
ये दोस्ती हम नहीं तोडेंगे ”
या शोले चित्रपटातील किशोर कुमार आणि मन्ना डे यांच्या गीताच्या हृदयस्पर्शी ओळींची आठवण व्हावी , असा क्षण पहूर कसबे येथील जिल्हा परिषद शाळेत अनुभवायला मिळाला… निमित्त होते मित्र मेळ्याचे … तत्कालीन शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांना शाळेचे दर्शन घेताना गहिवरून आले. सामाजिक भावनेतून या शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी पहूर गावाचा ऐतिहासीक ठेवा असलेल्या गोमूख जलकूंडाची श्रमदानातून स्वच्छता व खोलीकरण केले .आज व्हॉट्स अॅप, फेसबुकच्या दुनियेत माणसांच्या गर्दीत माणूस हरवत चाललेला आहे . मात्र याच माध्यमाचा सकारात्मक उपयोग करून पहूर कसबे येथील जिल्हा परिषद शाळेत १९९२—९३ या शैक्षणिक वर्षात इ.४ थीत शिकणाऱ्या विदयार्थ्यांनी तब्बल २५ वर्षांनी एकत्र येत मित्रमेळ्याचे आयोजन केले. मित्रमेळयाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन मुख्याध्यापिका सरूबाई मोरे या होत्या. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख देवीदास फिरके यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी तत्कालीन शिक्षक युवराज मोरे, शालीग्राम पाटील , श्यामराव नरवाडे, अनिल चौधरी , श्रीमती फिरके , विद्यमान मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनवणे, श्रीकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. संदीप राठोड, डॉ .प्रदीप राठोड, अॅड . उमेश त्रिभुवणे , सोमनाथ लोखंडे , अमोल बावस्कर , राजेंद्र सोनवणे , हरिभाऊ राऊत आदींनी शाळा अन् शिक्षकांप्रती कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या. प्रारंभी दिवंगत शिक्षक , विदयार्थ्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.वासुदेव घोंगडे यांनी प्रास्ताविक केले.
सामाजिक भावनेतून शिक्षक आणि माजी विदयार्थ्यांनी वाघूर नदीच्या तीरावर असलेल्या ऐतिहासीक गोमुख जलकुंडाची स्वच्छता व खोलीकरण करण्यात आले. तसेच पाणी फाऊंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वाघूर नदीच्या खोलीकरणास हातभार लावला. यावेळी चंद्रकांत भडांगे, डॉ. सुगौतकुमार तायडे, अर्जुन घोंगडे , ज्ञानेश्वर चौथे, प्रशांत भाग्यवंत , गणेश घोंगडे , अरूण बाळहिरडे, विकास लहासे, सुनिल लहासे, दिलीप चौधरी , ईश्वर बनकर , योगेश बनकर , सुनिल लहासे, भारत घोंगडे , अर्जुन घोंगडे, समाधान कचरे, संदीप चव्हाण, सोपान पवार, प्रकाश उबाळे, रफीक पटोकर ,कैलास पवार, उत्तम सोनवणे, विष्णू काळे, ईश्वर काळे, अनिल भोई, ज्ञानेश्वर घोंगडे , कांतीलाल सोनवणे ,समाधान घोंगडे , पंकज कुसूंबिवाल , भगवान कुमावत , किशोर गांगुर्डे ,ईश्वर सोनवणे, किरण जाधव , दिलीप तडवी, गणेश भिवसने, प्रकाश घोंगडे, संतोष जाधव , शिवदास जाधव ,जगदीश वारूळे, सुनिल सुरवाडे, प्रभाकर घोंगडे , समाधान जाधव, योगेश उबाळे, राजेश बनकर , दिपक जाधव , संतोष जाधव , विकास उबाळे , श्रावण घोंगडे , अमृत द्राक्षे आदींनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले . सुत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले .आभार स्वप्नील जैन यांनी मानले. शाळेचे प्रांगण , वर्गखोल्या, व्हरांडा पाहून विदयार्थी अन् शिक्षकांच्या गत आठवणी जाग्या झाल्या होत्या. शाळेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी मित्रमेळ्याच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचा आशावाद व्यक्त करून स्नेहभोजनाने मेळाव्याचा समारोप करण्यात आला . सामाजीक भान जोपासत राबविलेल्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतूक केले .