श्रीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जम्मू-कश्मीरच्या विधानसभा निवडणूकीच्या निकाल उद्या ८ ऑक्टोबरला लागणार आहे. त्यानंतर लगेच ५ आमदारांचे नामांकन केले जाईल. केंद्रीय गृह मंत्रालयांच्या आदेशाने जम्मू-कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे विधानसभेसाठी ५ आमदारांना नामानिर्देशित करतील. त्यामुळे आमदारांची एकूण संख्या ९५ होईल आणि बहूमताचा आकडा ४८ होईल.
कलम ३७० हटवल्यानंतर, नायब राज्यपाल जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा २०१९ अंतर्गत विधानसभेत 5 आमदारांना नामनिर्देशित करू शकतात. हा नियम महिला, काश्मिरी पंडित आणि पीओकेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणण्यात आला होता. जुलै २०२३ मध्ये यात सुधारणा करण्यात आली. या नामनिर्देशित आमदारांना विधानसभेतील मतदानाच्या अधिकारासोबतच विधानसभेचे सर्व अधिकार आणि विशेषाधिकार मिळतील.