Home Cities मुक्ताईनगर पुण्यातील “रेव्ह पार्टी” प्रकरणानंतर आ. एकनाथराव खडसे म्हणाले !

पुण्यातील “रेव्ह पार्टी” प्रकरणानंतर आ. एकनाथराव खडसे म्हणाले !


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आ. एकनाथराव खडसे यांचे जावई प्रांजल केवलकर यांना कथित ‘रेव्ह पार्टी’ प्रकरणात पकडण्यात आल्यानंतर, खडसे यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “गेल्या काही दिवसांतील वातावरणामुळे असे काही घडू शकते याचा मला अंदाज होता,” असे ते म्हणाले. “काही जण अडचणीच्या शेवटच्या टप्प्यावर असल्यामुळे असे घडणे शक्य आहे.”

या प्रकरणावर अधिक बोलणे टाळत खडसे म्हणाले की, पुण्यात घडलेली घटना त्यांनी चॅनेलच्या माध्यमातून पाहिली आहे, मात्र अद्याप त्यांचे जावयांशी बोलणे झालेले नाही. त्यांनी स्पष्ट केले की, जर या घटनेत खरोखरच रेव्ह पार्टी असेल आणि त्यात त्यांचा जावई दोषी आढळल्यास त्यांना कडक शासन झाले पाहिजे. “मी त्यांचे समर्थन करणार नाही,” असेही ते म्हणाले.

खडसेंनी या प्रकरणी पोलीस यंत्रणेने प्रामाणिक तपास करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. “बऱ्याचदा असे होऊ शकते की पोलीस काहीही करू शकतात अशी भावना जनमानसात आहे,” असे ते म्हणाले. त्यामुळे, व्यवस्थित फॉरेन्सिक आणि ब्लड रिपोर्ट आले पाहिजेत आणि या रिपोर्टनंतरच अधिक भाष्य करता येईल. अपूर्ण माहितीच्या आधारे भाष्य करणे योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केले.

या संदर्भात नंतर पत्रकार परिषद घेण्याचेही संकेत खडसे यांनी दिले. “हे प्रकरण कशा रीतीने घडवले जात आहे, याचे तथ्य समोर येईलच,” असे ते म्हणाले. “यामध्ये जावई असो की अन्य कोणी, जर दोषी असेल तर शासन झाले पाहिजे. पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही,” अशी टीका करत त्यांनी कोणत्याही प्रकारे चुकीच्या कारवाईला विरोध दर्शवला.


Protected Content

Play sound