पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील लासुरे तर ह.मु. पाचोरा येथील संघवी कॉलनीमधील प्रसिध्द वकील ॲड. दिनकर देवरे यांचे (वय-६८) आज (दि.३१ डिसेंबर) रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
अॅड. देवरे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस गावच्या सरपंच पदापासून सुरूवात केली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांचेवर तालुका प्रमुख, उपजिल्हाप्रमुखाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याने त्यांची पाचोरा कृषी बाजार समितीचे सभापती पदी वर्णी लावण्यात आली होती. माजी आमदार कै. आर. ओ. (तात्या) पाटील व आमदार किशोर पाटील यांचे ते अतिशय विश्वासु पदाधिकारी होते. दरम्यान, याघटनेमुळे पाचोरा शहर आणि लासूरे गावात मोठी शोककळा पसरली आहे.
अॅड. दिनकर देवरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, तीन भाऊ, एक बहीण असा परिवार असून त्यांचेवर शनिवारी सकाळी १० वाजता लासुरे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते जागृती विद्यालयाचे क्लार्क शरद माधवराव देवरे, आदर्श शेतकरी अंकुश व भरत देवरे यांचे बंधू होत.