बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । बीड जिल्ह्यातील आष्टीत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे ५० लाखांचा भेसळयुक्त दूध पावडर जप्त केल्याची कारवाई केल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात सुरू असलल्या भेसळयुक्त दूध पावडर आढळून आल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक दूध उत्पादन आष्टी तालुक्यात होते. मात्र, याच तालुक्याच्या दुग्धोत्पादनाला भेसळीचे ग्रहण लागले आहे. कारण, यापूर्वीदेखील बीडच्या आष्टी तालुक्यात काही दूध संघावरदेखील कारवाई करण्यात आली होती. त्यावेळीदेखील दूध तयार करण्याची भेसळयुक्त पावडर मोठ्या प्रमाणात सापडली होती. हाच प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया या ठिकाणी दूध तयार करण्याची भेसळयुक्त पावडर सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी-टाकळी अमिया येथील अंबादास पांडुरंग चौधरी याचे कडा येथील टाकळी अमिया रोडलगत दुकान आहे. तसेच लगत पत्र्याच्या शेडमध्ये गोडाऊन आहे. गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व पोलीस प्रशासनाने रविवारी पहाटे या ठिकाणी धाड टाकली.