रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रोजगार निमीत्त एका कंपनीत स्विझर्लंड (साऊथ आफ्रिका) येथे गेलेल्या रावेर तालुक्यातील खिरवळ येथील रहीवासी गोकुल सुकलाल गाढे वय ४४ याने आपल्या राहत्या रूमवर टोकाचा निर्णय घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांना गाढे कुटुंबियांकडून मृतदेह भारतात आणण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खिरवळ ता रावेर येथिल रहीवासी व अतिशय गरिबीची परिस्थतीती असलेला गोकुळ सुकलाल गाढे वय ४४ हा ओव्हासिस इंव्हेसमेंड प्रा लि या तेल कंपनीमध्ये रोजगार निमित्त स्विझर्लंड (साऊथ आफ्रिका) येथे गेला होता. त्याला जाऊन तीन महीने झाले होते.कंपनी जवळ असलेल्या त्याच्या राहत्या रूमवर त्याने आत्महत्या केली आहे. याबाबत त्याचा मृत्युदेह भारतात त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी आणण्यासाठी प्रशासनाने आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी मदत करावी अशी अपेक्षा गाढे कुटुंब करीत आहे. मयत गोकुळ गाढे यांच्या पश्चात दोन मुल एक मुलगी पत्नी लक्ष्मी गोकुळ गाढे, भाऊ महेंद्र गाढे, गोकुल तायडे आदी परिवार आहे. मृतदेह स्विझर्लंड येथून खिरवळ येथे आणण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी मदत करण्याचे गोकुल तायडे यांनी केले आहे.