जळगाव, प्रतिनिधी | शहरातील नेहरूनगरात गच्चीवर साचलेले पाणी व कचरा साफ करताना तोल जाऊन पडल्याने एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.२१) घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अर्जुन काशिनाथ पानखडे (वय ५३) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. ते जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. काल रात्री झालेला जोरदार पाऊस झाल्याने गच्चीवर साचलेले पाणी व गाळ काढण्यासाठी ते सकाळी ६.०० वाजता गच्चीवर गेले. कचरा साफ करत असताना त्यांचा तोल जाऊन गच्चीवरून खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नातेवाईकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता सकाळी ९.३० च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.