वरणगाव प्रतिनिधी । प्रशासन सुस्त झाल्याने सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांनी स्वखर्चातून नगरपालिकेच्या रस्त्यावर मुरुम टाकला आहे.
मागील काही दिवसापासून वरणगाव मध्ये पडणाऱ्या सतत पावसामुळे प्रभाग क्र.9 शिवाजीनगर येथे नगरपालिकेच्या रस्त्यावर चिखल व पाण्याचे डबके साचल्यामुळे नागरिकांचे हाल होत होते तर गेल्या काही दिवसापूर्वी रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे दोन ते तीन नागरिक त्या चिखलात देखील पडले. वारंवार स्थानिक नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार करून सुद्धा कुठलीच दखल प्रशासनाकडून घेतली जात नव्हती. तसेच स्थानिक नगरपालिका अधिकारी लोकांच्या होणाऱ्या या समस्यांकडे सपशेल दुर्लक्ष करत होते. त्यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे यांनी ही बाब लक्षात घेता स्वतः जबाबदारी घेऊन स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी चार ते पाच डंपरने मुरूम टाकून लोकांना होणारा त्रास व होणारे अपघात बाबत लोकांना दिलासा देण्याचे काम केले केलेल्या कामाबद्दल स्थानिक नागरिक लक्ष्मण भालेराव संजय पाटील गणेश इंगळे, मस्के उल्हास पाटील, चित्ते मावशी मिराबाई कोळी भास्कर काळे विशाल चौधरी आशिष शेजुळे यांनी आभार व्यक्त केले.