यावल प्रतिनिधी । शहरातील सरस्वती विद्यामंदिर माध्यमीक शाळेचा दहावीच्या निकालात ९५.५३ टक्के लागला असून कल्पेश मोहनदास सोनार याने ९५.६० टक्के गुण मिळवून प्रथम आला तर तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मेडीयम स्कूलमधून आदित्य पाटील ९३.८० टक्के मिळवून प्रथम आला आहे.
सरस्वती विद्यामंदिर माध्यमीक शाळेचा दहावीच्या निकालात ९५.५३ टक्के लागला असून कल्पेश मोहनदास सोनार याने ९५.६० टक्के गुण मिळवून प्रथम आला. द्वितीय मनीष ज्ञानेश्वर पाटील व कुंदन संतोष तायडे या दोघांनी ९२.४ टक्के गुण मिळवत शाळेत व्दितीय क्रमांक तर भूषण प्रवीण कुयटे- ९१.२ टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. कल्पेश सोनार हा यावल नगर परिषदमधील कर्मचारी व अपंग संस्थेचे माजी तालुकाध्यक्ष मोहन सोनार यांचा मुलगा आहे. यशस्वी विध्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष रमण नानासाहेब देशपांडे, उपाध्यक्ष अरुण कुळकर्णी, नगराध्यक्षा नौशाद तडवी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू भगिनींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
किनगाव इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के
किनगाव येथील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळून आदित्य सुनिल पाटील याने ९३.८०टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक, हिमांशु नरेंन्द्र महाजन ९१ टक्के गुण मिळवून द्वितीय तर ज्ञानेश्वर मधुकर पाटील ९०.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन विजयकुमार पाटील, सचिव मनिष पाटील, प्राचार्य अशोक पाटील, प्राचार्य संजय उधोजी, राजश्री अहिरराव, मिलींद भालेराव, दिनकर पाटील व रोहिणी उधोजी यांनी अभिनंदन केले आहे.