जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी यांच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील महिला वस्तीगृहातील विद्यार्थिनींसाठी व्यसनमुक्ती आणि महिला सबलीकरण या विषयावर एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या डॉ. लीना पाटील यांनी विद्यार्थिनींना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “आजकाल महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे, ही एक गंभीर चिंतेची बाब आहे. भविष्यात यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतात.” या वाढत्या व्यसनांमुळे महिलांचे आरोग्य आणि त्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच त्यांना व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. महिला सबलीकरणामुळे त्या आत्मनिर्भर बनतात आणि समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावतात, असा संदेशही या वेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी आणि डॉ. मनीषा जगताप यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमात हरिता विसावे, प्रिया महाजन, वेदिका चौधरी, जयश्री महाजन, आस्था पाटील, वैशाली जोशी, ज्योती नवाल, अमृता सोनवणे आणि कविता नाईक यांसह अनेक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.



