
रावेर (प्रतिनिधी) येथील कल्पना दिलीप पाटील यांची महाराष्ट्र शिक्षक पॅनलद्वारा दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील १५५ गृपच्या माध्यमातून ३९००० हजार शिक्षकवृंदांना जोडून सुपरफास्ट शै.अपडेट देणारे नेटवर्क पॅनल म्हणून ओळख निर्माण केली आहे. एक मोठी चळवळ उभी करणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पॅनलद्वारा आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला असुन या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दिनांक: ३१ मे रोजी तापडिया नाट्यमंदिर निराला बाजार औरंगपुरा, औरंगाबाद येथे होणार आहे त्यांच्या निवड झाल्या बद्दल रावेर तालूक्यातून त्यांचे अभीनंदन होत आहे.