Home राजकीय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश


मुंबई (प्रतिनिधी) अनेक दिवसाच्या चर्चेनंतर प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन उर्मिलाने पक्षप्रवेश केला. उर्मिला काँग्रेसतर्फे मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

लहानपणापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांनी मला प्रभावित केले आहे. शिवाय काँग्रेसच्या विचारधारेवर माझा विश्वास असल्याचे उर्मिला यावेळी सांगितले. भाजपने उत्तर मुंबईतून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. शिवाय शेट्टी यांची या परिसरात चांगले वजन असल्यामुळे त्यांच्यासमोर टिकाव लागण्यासाठी काँग्रेसला तगड्या उमेदवार हवा होता. दरम्यान, उत्तर- मुंबई मतदार संघात काँग्रेसकडून अभिनेत्री आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरु होती. परंतु आता उर्मिलाचे तिकीट याठिकाणी निश्चित मानले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound