मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला अटक करण्यात येऊन १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनवली होती. आज चितळेची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्या सुनावणीनंतर तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच यासंदर्भात तिच्यावर १० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाणे क्राईम ब्रांचकडून १५ मे रोजी केतकी चितळेला अटक करण्यात येऊन दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज तिची कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले. यानंतर केतकी चितळेला पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
चितळेची पोलीस कोठडी संपल्यापूर्वीच तिला ताब्यात घेण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणचे पोलीस न्यायालयात उपस्थित होते. यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानने तिच्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल असून देहूरोड पोलीस तिचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात हजर असतांनाच पिंपरी-चिंचवड, गोरेगाव आदि पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असल्याने तिचा ताबा मागितला आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला ऊत
रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी केतकीनं न्यायालयात स्वत:ची बाजू स्वत: मांडली असे म्हटले, त्यावरून सदाभाऊ खोत यांच्यावर तर केतकी चितळेने केलेल्या पोस्टमध्ये शरद पवारांचे नाव नाही, असे म्हणत तिची बाजू घेण्याचा प्रयत्न तृप्ती देसाई यांनी केला म्हणून तृप्ती देसाई यांच्यावर देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका केली जात आहे.