नेहरूंविषयी वादग्रस्त विधान केल्याने अभिनेत्री पायल रोहतगीला अटक

Actor Payal

 

मुंबई वृत्तसंस्था । काही दिवसांपूर्वी मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने स्वातंत्र्य सेनानी मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारा व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या त्या वक्तव्याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी पायलला रविवारी सकाळी अटक केली आहे. पायलने स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

पायलने पंतप्रधान ऑफिस आणि गृह मंत्रालयाला टॅग करून ट्वीट करत म्हटलं की, ‘मला राजस्थान पोलिसांनी मोतीलाल नेहरू यांच्यावर व्हिडिओ बनवला म्हणून अटक केली. मी जे बोलले ती सर्व माहिती गूगलवरून घेतली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एक थट्टा राहिली आहे.’ एसपी ममता गुप्ता यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, पायल रोहतगी विरोधात याचिका दाखल झाल्यानंतर तिला अटक करण्यात आले. पोलिसांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल पायल रोहतगीविरोधात कलम ६६ आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण :-
अभिनेत्री पायलने देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या वडिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तिने एक व्हिडिओ शेअर करत दावा केला की, ‘मला वाटतं की मोतीलाल नेहरू यांच्या पाच पत्नी होत्या, म्हणून काँग्रेस सरकार तिहेरी तलाकच्या विरोधात होते. यासोबतच मोतीलाल नेहरू हे जवाहरलाल नेहरू यांचे सावत्र वडील होते.’ पायलने आपल्या या दाव्यात एलिना रामाकृष्णाने लिहिलेल्या आत्मचरित्राचा उल्लेख केला होता.

Protected Content