जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वांजोळा रोड परिसरात दोन पिस्तूल व दोन जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या दोन संशयित आरोपींवर भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी कारवाई शनिवार ५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील वांजोळा रोड परिसरात दोन जण हातात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल वाघ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता कारवाई करत संशयित आरोपी मुकेश मोहन अटवाल वय २० वाल्मिक नगर, भुसावळ आणि यश किरण बोयत वय २२ रा. हॉटेल तनरिका जवळ भुसावळ यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून दोन गावठी पिस्तूल आणि दोन जीवंत काडतूस असा एकुण ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता पोलीस कॉन्स्टेबल राहूल वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मुकेश मोहन अटवाल वय २० वाल्मिक नगर, भुसावळ आणि यश किरण बोयत वय २२ रा. हॉटेल तनरिका जवळ भुसावळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश चौधरी हे करीत आहे.