धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील आव्हानी शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या ट्रॅक्टरवर धरणगाव पोलिसांनी शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी शनिवारी 28 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12.30 वाजता ट्रॅक्टर चालकावर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील आव्हाने गावाजवळ असलेल्या गिरणा नदीपात्रातून वाळूची मोठ्या प्रमाणावर उपसा करून वाहतूक होत असल्याची माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार पथकाने शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता गिरणा नदीपात्रामध्ये कारवाई केली. यावेळी विना क्रमांकाचे ट्रॅक्टर जप्त केले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विजय जनार्दन तायडे (रा. बांभोरी ता. धरणगाव) यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार सुनील लोहार हे करीत आहे.