गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांवर एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापूरा येथील महादेव मंदीर परिसरात गावठी कट्टा आणि दोन जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या दोन जणांवर एमआयडीसी पोलीसांनी सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी पहाटे ४ वाजता दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती आशी की, जळगाव शहरातील तांबापूरा येथील महादेव मंदीर परिसरात दोन जण गावठी पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजता कारवाई करत संशयित आरोपी साहिल मोहम्मद तडवी वय २२ आणि दिपक शांताराम रेणूके वय २१ दोन्ही रा. तांबापूरा यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जीवंत काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी पोहेकॉ अफजल बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी साहिल मोहम्मद तडवी वय २२ आणि दिपक शांताराम रेणूके वय २१ दोन्ही रा. तांबापूरा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद बागल हे करीत आहे.

Protected Content