गुटख्याची विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई; ५५ हजार साठा जप्त

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील राजमल चौक येथून दुचाकीवर प्रतिबंधित पानमसाला विक्री करीत असताना ५५ हजार ५५५ रुपयांचा साठा तसेच ३० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ८५ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता राजकमल चौकात करण्यात आली. या प्रकरणी रात्री ९ वाजता दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत असून वाहनांचीही तपासणी केली जात आहे. यामध्ये शनिपेठ पोलिस ठाण्याचे पथक राजकमल चौकात शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता नाकाबंदी करीत असताना प्रमोदकुमार नरेश सहानी (वय २५) व गोविंदकुमार रामदुलार सहानी (वय-३७) दोन्ही रा. नशिराबाद हे दुचाकीवर (क्र. एमएच १९, बीएन ५४६६) प्रतिबंधित पानमसाला विक्री करीत होते. त्यांच्याकडून पथकाने ५५ हजार ५५५ रुपयांचा साठा व दुचाकी जप्त केली. याप्रकरणी पोहेकॉ योगेश माळी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रिया दातीर करीत आहेत.

Protected Content