Home क्राईम अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई; दोन जणांना अटक

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर कारवाई; दोन जणांना अटक

0
118

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा चौफुलीवर बेकायदेशीरपणे दोन डंपरमधून वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन डंपर आणि वाळू जप्त केले आहे. याप्रकरणी मंगळवारी १३ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव पाचोरा रोडवरील वावडदा चौफुली वरून बेकायदेशीरपणे दोन डंपरमधून वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री कारवाई करत संपर्क क्रमांक (एमएच १९ सीएक्स ५९८७) आणि (एमएच १९ सीएक्स २८९८) या दोन डंपरवर कारवाई केली. यावेळी वाळू वाहतूकीचा कोणत्याही परवानगी नसल्याने पोलिसांनी संशयित आरोपी शेखर वासुदेव सोनवणे वय-२४, रा. कानसवाडा ता. जळगाव आणि महेश प्रकाश नाईक वय-२९, रा. खडकी ता. जामनेर या दोघांना अटक केली. त्यांच्याजवळील दोन्ही वाहने देखील जप्त केले आहेत. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही डंपर चालकांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound