भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील संभाजी नगरात हातात चॉपर घेवून दहशत माजवित असलेल्या संशयितावर भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी शनिवारी ८ जून रोजी दुपारी १२ वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरमसिंग उर्फ गोलू रायसिंग पंडीत वय २८ रा. वाल्मिक नगर, जळगाव असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील संभाजी नगर येथील परिसरात संशयित आरोपी धरमसिंह पंडीत हा परिसरात बेकायदेशीर पध्दतीने हाता चॉपर घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी शनिवारी ८ जून रोजी दुपारी १२ वाजता कारवाई करत संशयित आरोपी धरमसिंह पंडीत याच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून चॉपर हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी ६ वाजता बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रमण सुरळकर हे करीत आहे.