Home Cities अमळनेर अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील तापी नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत वाळू आणि ट्रॅक्टरसह एकूण ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२३ जानेवारी रोजी सकाळी मारवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

आरोपी भूषण बापू कोळी (रा. पिंपळी, ता. अमळनेर) हा आपल्या विना क्रमांकाच्या निळ्या रंगाच्या सोनालिका ट्रॅक्टरमधून विनापरवाना वाळूची वाहतूक करत असताना पकडला गेला. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे ५ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू भरलेली होती. चोरट्या पद्धतीने गौण खनिजाची चोरी केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound