फैजपूर प्रतिनिधी । यावल-फैजपूर रोडवरील साखर कारखानासमोर बेकायदेशीर गुटखा आणि पानमसालाची वाहतूक करणारे वाहन पोलीसांनी ताब्यात घेतले त्यात अडीच लाखांचा मुद्देमाल आढळून आला आहे. याप्रकरणी दोन जणांवर फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, बेकायदेशीर रित्या गुटखा आणि पानमसाला, विमल पान मसाला, तंबाखू मालाची वाहतूक होत असल्याची माहिती फैजपूर पोलीसांनी मिळाली. त्त्यानुसार पोलीसांनी २९ मे रोजी दुपारी ४ वाजता मधुकरराव सहाकारी साखर कारखानाजवळ सापळा रचला. यावेळी (एमएच १९ सीडब्ल्यू २८०६) क्रमांकाची पॅजो रिक्षा वाहन तपासणी करत असतांना वाहनात सुमारे २ लाख ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल आढळून आला. यात गुटखा, पानमसाला, विमल पानमसाला असा एकुण २ लाख ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. वाहतूक करणारे संशयित आरोपी मुनवर खान अफजलखान (वय-२०) रा. मिल्लत नगर फैजपूर ता. यावल आणि शेख इमरान शेख इकबाल (वय-२२) रा. इस्लामपुरा फैजपूर ता. यावल या दोघांना अटक केली आहे. दोघांवर फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे करीत आहे.