तांदळी पडावद फाट्याजवळील पांझरा नदी पात्रात वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर कारवाई; मारवड पोलीसात नोंद

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील तांदळी पडावद फाट्याजवळ रविवारी २८ जुलै रेाजी मध्यरात्री १ वाजता महसुल पथकाने कारवाई करत पांझरा नदी पात्रातून अवैधपणे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पांझरा नदी पात्रातून अवैधपणे वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर आणि तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना मिळाली. त्यानुसार अमळनेर महसूल पथकाने रविवारी २८ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता कारवाई करत विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले. यावेळी पथकाला पाहून ट्रॅक्टर चालका वाहन सोडून पसार झाला. पथकाने जप्त केलेले वाहन मारवड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर आणि तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तलाठी जितेंद्र जोगी, सारबेटे तलाठी आशिष पारधे, जळोद तलाठी जितेंद्र पाटील यांनी केली आहे.

Protected Content