वाळूने भरलेला डंपरवर कारवाई; चालकास अटक

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ वाळूने भरलेला डंपरवर शहर पोलिसांनी कारवाई करत डंपर जप्त केला आहे. याप्रकरणी शुक्रवारी २० डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता डंपरचालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात वाळू वाहतुकीला पूर्णपणे बंद असताना देखील शहरातून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक होत आहे. या अनुषंगाने गुरूवारी १९ डिसेंबर रोजी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावरून वाळूने भरलेला डंपर शहर पोलिसांनी पकडला. यावेळी डंपर चालकाला वाळून वाहतुकीबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. तसेच ही वाळू त्याने तापी नदी पात्रातून आणल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी वाळूने भरलेला डंपर जप्त केला आहे. याप्रकरणी शुक्रवारी २० डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालक राजेंद्र भागवत कोळी (वय ३६, रा. साकेगाव ता. भुसावळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील करीत आहे.

Protected Content