मोठी बातमी : वाळू उपसा करणाऱ्या 8 ट्रॅक्टरवर कारवाई: 8 जणांना अटक

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात धरणगाव महसूल पथकाने शनिवारी दुपारी 4 वाजता कारवाई करत आठ ट्रॅक्टर जमा केले आहे. तर याप्रकरणी सायंकाळी धरणगाव पोलिसात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी गावातील किरण नदीपत्रातून अवैधपणे वाढू उपसा करणाऱ्या आठ ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये अक्षय भास्कर पाटील, उज्वल कैलास पाटील, गणपत पुंडलिक नन्नावरे, जितेंद्र लक्ष्मण नन्नावारे, विशाल विजय सपकाळे, किरण त्रंबक पाटील, ज्ञानेश्वर गुलाब पाटील सर्व रा. पाळधी, बांभोरी आहेत. यांच्यावर कारवाई करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात शनिवारी 28 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पवन देसले, सपोनि प्रशांत कंडारे, सपोनि निलेश वाघ यांनी केली आहे.

Protected Content