रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील अहीरवाडी वनपरीमंडळात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर रावेर वनविभागाने कारवाई केली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार रावेर तालुक्यातील पाडले खुर्द वन विभागाची टीम गस्त करीत असतांना अज्ञात इसम अवैध वृक्षतोड करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनविभागाने बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी कारवाई केली. आढळुन आले,सदर इसमांचा पाठलाग केला असता ते धावडा नग व खुंट तसेच त्यांचे जवळ असलेले विना नंबर प्लेटचे बजाज डिस्कवर कंपनीचे दोन मोटार सायकल सोडून पसार झाले. वनविभागाने दोन्ही दुचाकी आणि धावड नग जप्त केले आहे.
ही कारवाई वनसंरक्षक धुळे निनु सोमराज उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रादे.व कॅम्पा यावल समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अहिरवाडी, वनरक्षक पाडले (खु) व राऊंड स्टॉफ तसेच वनमजूरद्वारे करण्यात आली.