जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गोलाणी मार्केटमध्ये आज दुपारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अचानकपणे धडक कारवाई सुरु केली.
या कारवाईत दुकानदारांनी अनधीकृतपणे लावलेले बॅनर व होर्डिंग हटवण्यात आले. या कारवाईमुळे मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. महानगर पालिका अतिक्रमण विभागातील कर्मचार्यानी आज दुपारी १२ च्या सुमारास ही कारवाई सुरु केली. अनेक दुकानांच्या बाहेर लोखंडी रेलिंगवर लावण्यात आलेले मोठमोठे फलक यावेळी काढून टाकण्यात येऊन जप्त करण्यात आले. दुपारी संपूर्ण मार्केटमध्ये बराचवेळ ही कारवाई सुरु होती.