मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या अनेक महिन्यांपासून एकनाथ शिंदे हे बंडाची तयारी करत असतांना याची जरादेखील खबर न लागल्याने आणि त्यांना सुरक्षितपणे गुजरातच्या सीमेवर पोहचवल्याची माहिती देखील न देणार्या सुरक्षा रक्षकांसह संबंधीत आमदारांच्या शासकीय पी.ए. यांच्यावर राज्य सरकार कारवाई करण्याची शक्यता आहे.
एबीपी-माझा या वाहिनेने आज एक विशेष वृत्त प्रकाशित केले असून यात राज्य सरकार आता बंडखोरी करणार्यांच्या तैनातीत असणारे पोलीस अधिकारी, एस्कॉर्ट स्कॉड आणि शासकीय स्वीय सहायकांवर कारवाई करणार असल्याचे नमूद केले आहे. या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या जवळपास ४० आमदारांच्या झडज अर्थात पर्सनल सेक्रेटरी ऑफिसर, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत.
राज्य सरकार या सर्व अधिकार्यांवर कारवाई करणार आहे. या सर्व आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राची हद्द सोडत असताना या सर्व अधिकार्यांनी प्रशासनाला आणि गुप्तचर विभागाला माहिती न दिल्याने या सर्वांवर कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना त्या त्या जिल्ह्यातील आमदारांच्या या अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले असल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेत फुट पाडतील याची माहिती शासकीय यंत्रणांना मिळू नये याबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.