गोमांस बाळगणाऱ्या चौघांवर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मासूमवाडी परिसरात अवैधपणे विक्रीसाठी गोमांस बाळगणाऱ्या ४ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी ५ जून रोजी सकाळी ११ वाजता कारवाई केली. याप्रकरणी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मासूमावाडी परिसरात विक्रीसाठी गोमांस आणल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीसाच्या पथकाने बुधवारी ५ जून रोजी सकाळी ११ वाजता मासमवाडी परिसरात कारवाई केली. या ठिकाणी चार जणांकडून पोलिसांनी गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश सुरेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुजाहिद मोहम्मद जाबीर वय-३२, शेख अनवर शेख शकीर कुरेशी वय-३०, नेहाल खान नूरखान कुरेशी वय-५७ आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड हे करीत आहे.

Protected Content