मुख्यमंत्री शपथविधीला जाणार सावद्याचे आचार्य मानेकर बाबा

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नवीन सरकारच्या शपथविधीला ऐतिहासिक गंध आला आहे. कारण यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देशभरातील प्रमुख संत महंत एकत्र येणार आहेत. या शपथविधीसाठी श्री दत्त मंदिर संस्थान सावदा येथील महानुभाव संप्रदायाचे धर्माचार्य माणेकर बाबा यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. ५ डिसेबर रोजी मुंबईत भव्य समारंभ होणार आहे.

एकाच ठिकाणी राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील दिग्गज एकत्र येतील. तीन प्रमुख व्यासपीठे तयार केली जात आहेत आणि ती सर्व एकत्र येणाऱ्या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार ठरतील. धर्म, अध्यात्म आणि समाज सुधारणा यांच एक सुंदर मिश्रण पाहायला मिळणार आहे. शपथविधीमध्ये जो प्रारंभ होईल, तो केवळ एक राजकीय घटना नाही, तर समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीचा एक गोड टप्पा असणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात राजकारण आणि धर्माचा संगम होईल, जे संपूर्ण राष्ट्राच्या एकतेची ताकद दाखवेल.

Protected Content