विज चोरी करणाऱ्या आरोपी १ वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरण कंपनीने बसवलेल्या मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्या एकाला १ वर्ष सक्त मजुरीचे शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड जळगाव जिल्हा न्यायालयाने मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता सुनावली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की भडगाव तालुक्यातील दोन गाव येथील रहिवासी रउफ अली अहमद अली याचे टोनगाव शिवारात कंपनी आहे.  या कंपनीत महावितरण कंपनीच्या वतीने मीटर बसवण्यात आले आहे. दरम्यान रउफ अली अहमद अली याने मीटरची छेडछाड करत रिमोट कंट्रोल व जामरसारख्या उपकरणे बंद केल्याचे आढळून आले होते. यामध्ये जवळपास २४ महिन्यात एकूण महावितरण कंपनीचे  १५ लाख ३३ हजार ६९० रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात रउफ अली अहमद अली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. यात पंच व फिर्यादी यांचे साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. जळगाव जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश जे.जे. मोहिते यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात आला. यामध्ये सरकारी वकील वैशाली महाजन यांनी प्रभावी बाजू मांडली. युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टासमोर आलेल्या पुरावा लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी रउफ अली अहमद अली याला दोषी ठरवत १ वर्षाची सक्त मजुरीचे शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच महावितरणची रक्कम १५ लाख ३३ हजार ६९० रुपये ही ३ महिन्याच्या आत वीज वितरण कंपनीला भरून देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.

Protected Content