शेंदूर्णी प्रतिनिधी | शिरसोली येथील दिवंगत प्राजक्ता बुंदेला न्याय मिळण्यासाठी संबंधित आरोपींवर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी नातेवाईकांच्या वतीने पहूर पोलीस स्टेशनचे पीआय यांना निवेदन देण्यात आलं.
शेंदूर्णी येथील माहेर असलेल्या प्राजक्ता बुंदे या विवाहितेचा आणि शिरसोली येथे विवाह झाला. त्यानंतर सुरुवातीपासूनच तिच्या सासरच्यांनी पैशांच्या मागणीसाठी त्रास देत सातत्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला असून तिच्या सासरच्यांनी खून करून तिला फासावर लटकविले असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.
यामुळे तिच्या पतीसह सासरच्या मंडळीला फाशीची शिक्षा करावी अशी मागणी आज तिच्या माहेरच्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असून मागणीसाठी पहूर पोलीस स्टेशनचे पीआय यांना निवेदन देण्यात आलं.